fbpx

इव्हीएमच्या मेहरबानीनं लोकसभा जिंकलेली भाजप विधानसभा जिंकण्याचं स्वप्न पहातय – धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेच्या हवेवर विधानसभा जिंकण्याचं स्वप्न बघत असाल, पैसा, इव्हीएम मॅनेज करुन पुन्हा जिंकू असं सरकारला वाटत असेल तर ते मूर्खांच्या नंदनवनात आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली, लोकसभा निवडणुकीत भाजप – शिवसेना महायुतीने दणदणीत विजय मिळवला. राज्यात भाजपला २१ , शिवसेनेला १८ , राष्ट्रवादीला ५, कॉंग्रेसला १ तर वंचित बहुजन आघाडीला १ अशा जागा मिळाल्या. विरोधकांनी महायुतीच्या या विजयाचे खापर ईव्हिएमवर फोडले.

याचदरम्यान, जनतेच्या मूलभूत प्रश्नांना बगल देत राष्ट्रवादाचा मुद्दा चर्चेत आणल्यानं आणि इव्हीएमच्या मेहरबानीनं भाजपने लोकसभा जिंकली, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली. इतकेच नव्हे तर, भाजप लोकसभेच्या हवेवर विधानसभा जिंकण्याचं स्वप्न बघत असेल, पैसा, इव्हीएम मॅनेज करुन पुन्हा जिंकू असं सरकारला वाटत असेल तर ते मूर्खांच्या नंदनवनात आहेत, असेही मुंडे यांनी म्हंटले.