शिवस्मारकाचा साधा उल्लेखही अर्थसंकल्पात नसणे दुर्दैवीचं – धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या स्मारकाच्या मुद्यावरून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर निशाणा साधला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रलंबित असलेल्या शिवस्मारकाचा साधा उल्लेखही अर्थसंकल्पात नाही, ही बाब दुर्दैवी. अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसरा दिवशी, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात राज्य सरकारने अनेक घोषणा केल्या. मात्र अरबी समुद्रात होऊ घातलेल्या शिवस्मारकासंदर्भात साधा उल्लेखही करण्यात आलेला नाही. असे म्हणत राज्यातील सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर सत्तेत आले आहे. परंतु, छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रलंबित असलेल्या शिवस्मारकाचा साधा उल्लेखही अर्थसंकल्पात नाही, ही बाब दुर्दैवी आहे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.Loading…
Loading...