fbpx

लिंगायत, वडार, कोळी समाजाच्या आरक्षणावरून धनंजय मुंडेंचा सरकारला टोला

dhananjay munde and devendra fadnvis

टीम महाराष्ट्र देशा : मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षणावरून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर निशाणा साधला. धनगरांना व मुस्लीमांना अद्याप आरक्षण दिलेलं नाही. लिंगायत, वडार, परीट, कुंभार व कोळी समाजाच्या आरक्षणाबाबत तर सरकार निशब्द आहे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी किली.

राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. दरम्यान, विरोधकांकडून सरकारव कोंडीत पकडण्याचे काम सुरु आहे, याचदरम्यान, मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षणावरून धनंजय मुंडे यांनी सरकारवर निशाणा साधला.मराठा आरक्षणाबाबत सरकार न्यायालयात ठोस बाजू मांडण्यात असफल ठरले. धनगरांना व मुस्लीमांना अद्याप आरक्षण दिलेलं नाही. लिंगायत, वडार, परीट, कुंभार व कोळी समाजाच्या आरक्षणाबाबत तर सरकार निशब्द आहे, असे मुंडे यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, त्यामुळे अभिभाषणात या समाजांचा उल्लेख करुन एक नवीन गाजर या समाजाला सरकार दाखवत आहे, अशी टीका मुंडे यांनी केली.