साहेबांनी महाराष्ट्रात जितकी विमानतळं बांधली, तेवढी बस स्थानकं सुद्धा गुजरातमध्ये नसतील – मुंडे

blank

टीम महाराष्ट्र देशा: आता भाजपमध्ये देखील  विभाजन झालं आहे,  भाजप ओरिजनल आणि भाजप नवभरती असे भाग पडले आहेत. भाजपच्या अध्यक्षांची आमच्या मातीत येऊन, पवार साहेबांविषयी बोलण्याची हिंमत कशी होते. साहेबांनी महाराष्ट्रात जितकी विमानतळं बांधली तितकी बस स्थानकं सुद्धा तुम्ही गुजरातमध्ये बांधली नसतील, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

राष्ट्रवादीचे माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाचे ऐकऐक शिलेदार सोडून जात असल्याने शरद पवार हेच आता मैदानात उतरले आहेत. मंगळवारी सोलापूर पाठोपाठ उस्मानाबाद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी धनंजय मुंडे यांनी भाजप आणि  राष्ट्रवादी सोडून जाणाऱ्यांवर सडकून टीका केली आहे.

२१व्या शतकातील छत्रपतींचा इतिहास काय असेल तर आपले दैवत शिवाजी महाराज यांच्या घराण्यात फुट पाडणाऱ्या अनाजी पंतांचे नेतृत्व छत्रपतींच्या वारसांनी स्विकारलं. ज्यांच्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराजांचा सळसळता स्वाभिमान आहे त्यांचा हा घोर अपमान आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा, सुराज्याचे स्वप्न शरद पवार हे पुढे नेत असल्याचं मुंडे यावेळी म्हणाले.

दरम्यान, राजे गेले, सरदार गेले, सेनापती गेले अभिमान मात्र राष्ट्रवादीचे मावले आजही पवार यांच्या पाठिशी खंबीपणे उभे आहेत. ज्यांना शरद पवार यांच्यामुळे सिंहाची कातडी मिळाली, त्यांच्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुक्ती मिळाली. मराठवाडा मुक्तीसंग्रामानंतर त्या पिढीला जितका आनंद झाला असेल तितकाच आनंद आज उस्मानाबादच्या कार्यकत्यांना झाला, अशी टीका धनंजय मुंडे यांनी राणाजगजितसिंह यांच्यावर केली आहे.