चुकीला माफी नाही ! आता दानवेंच्या बुडावर गोळी मारण्याची वेळ आली आहे- धनंजय मुंडे

जालना : शेवगावमध्ये शेतकरी आंदोलन सुरू असताना शेतकऱ्यांवर गोळीबार झाल्यानंतर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या पायावर गोळ्या मारायला हव्या होत्या अस संतापजनक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी चांगलाच समाचार घेतलाय.

शेतकऱ्यांच्या पायावर गोळी मारा म्हणणाऱ्या रावसाहेव दनवेंच्या चुकीला माफी नाही , आता त्यांच्या बुडावर गोळी मारण्याची वेळ आली आहे. असा टोला धनंजय मुंडे यांनी रावसाहेब दणावेंना लगावला आहे. ते जालना येथे राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या हल्लाबोल मोर्चात बोलत होते.