सरकारी दिनदर्शिकेतून शाहू, फुले,आंबेडकर यांना वगळलं ; धनंजय मुंडे आक्रमक

सरकारला महामानवांच्या स्मृती पुसून टाकायच्या आहेत का ?

टीम महाराष्ट्र देशा : “सरकारी दिनदर्शिकेत महात्मा फुले यांची पुण्यतिथी,महापरिनिर्वाण दिनाचा उल्लेख नसावा ही गंभीर बाब आहे.या सरकारकडुन वारंवार महामानवांचा अवमान होत आहे.माहिती व जनसंपर्क विभाग वारंवार चुका करत असतांना कारवाई मात्र केली जात नाही.या सरकारला महामानवांच्या स्मृती पुसून टाकायच्या आहेत का ?” असा आक्रमक सवाल विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला केला आहे.

महाराष्ट्र शासनाची दरवर्षी दिनदर्शिका प्रकाशित होत असते.त्यामध्ये सर्व महापुरषांच्या जयंती,पुण्यतिथी दिनाचा उल्लेख केलेला असतो,मात्र यावर्षीच्या दिनदर्शिकेत तशा प्रकारचा उल्लेख दिसत नाही.त्यावरून राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी त्यांच्या ट्विटरच्या अधिकृत पेजवरून सरकारवर निशाणा साधला आहे.

नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे ?

सरकारी दिनदर्शिकेत महात्मा फुले यांची पुण्यतिथी,महापरिनिर्वाण दिनाचा उल्लेख नसावा ही गंभीर बाब आहे.या सरकारकडुन वारंवार महामानवांचा अवमान होत आहे.माहिती व जनसंपर्क विभाग वारंवार चुका करत असतांना कारवाई मात्र केली जात नाही.या सरकारला महामानवांच्या स्मृती पुसून टाकायच्या आहेत का? या दिनदर्शिकेवर शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे छायाचित्र नाही.

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वैभवाचा कसलाही उल्लेख दिनदर्शिकेवर नाही. ही दिनदर्शिका काय फक्त मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे फोटो दाखवण्यासाठी आहे काय?महामानवांच्या विचारांवर राज्यकारभार चालणे अपेक्षित असताना नेमका त्यांचाच विसर शासनाला पडणे हे गंभीर व अक्षम्य आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तात्काळ स्पष्टीकरण करावे व राज्यातील जनतेची माफी मागावी तसेच या प्रकरणातील दोषींवर तातडीने कारवाई केली पाहिजे.

You might also like
Comments
Loading...