VIDEO: बीडमध्ये राष्ट्रवादीच्या दुफळीचा ‘हल्लाबोल’

टीम महाराष्ट्र देशा: बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर उभी आहे. आधी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते सुरेश धस यांनी भाजपशी घरोबा केला आणि आता नराज जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीच्या ‘हल्लाबोल’ यात्रेकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच अंतर्गत कलहावरून बीड मधील नेत्यांनी एकमेकांवर ‘ हल्लाबोल’ सुरु केले आहे.

हल्लाबोल यात्रा काल बीड जिल्ह्यात होती. या यात्रेला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील पक्षाचे उपनेते जयदत्त क्षीरसागर गैरहजर होते. विषेश म्हणज्ये हल्लाबोल यात्रा तुळजापूरहून सुरू झाली. पहिल्या दिवशी जयदत्त क्षीरसागर यात्रेला हजर होते. मात्र त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात ते गैरहजर राहिले. यावरून आता रान पेटल आहे.

जयदत्त क्षीरसागर यांच्या गैरहजेरीवरून विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी क्षीरसागर यांचे नाव न घेता त्यांना चांगलच फैलावर घेतलं आहे. मुंडे म्हणाले, “हल्लाबोल हा कोणा एका व्यक्तीचा प्रश्न नाही मात्र राष्ट्रवादीतील काही जण सध्या कन्फ्युज आहेत. आष्टीवाल्याचं जे झालं ते आपलं होईल का अशी शंका त्यांना येत असल्याने त्यांनी हल्लाबोल कडे दुर्लक्ष केले, राष्ट्रवादी कोणाची एकट्याची नाही, हल्लाबोल हा शेतकऱ्यांसाठी आहे. त्यामुळे सगळ्या बीड जिल्ह्याने यात सहभागी व्हावे”

दरम्यान, बीड विधानसभा मतदार संघात पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्याकडे सूत्रं दिल्याने जयदत्त क्षीरसागर नाराज आहेत. अशात संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांना उद्देशून ‘दादा मला आशीर्वाद द्या मी निवडणूक लढवण्यास तयार आहे’ अस वक्तव्य करून या आगीत अजूनच तेल ओतल आहे. आता या सगळ्यांवर जयदत्तअण्णा काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचच लक्ष असणार आहे.

पहा धनंजय मुंडे काय म्हणाले जयदत्त क्षीरसागर यांना

3 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...