तू मारलेला प्रत्येक यादगार फटका, किपिंग करताना उडवलेल्या दांड्या सदैव आठवणीत राहील

dhoni- munde

चेन्नई : एक वर्षापासून क्रिकेटपासून दूर असलेल्या भारताचा दिग्गज यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप आहे. सैनिकी स्टाईलमध्ये इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करुन त्याने याची घोषणा केली. धोनीने आपल्या संपूर्ण प्रवासाचा एक व्हिडिओ शेअर केला आणि सांगितले की संध्याकाळी 7.29 पासून त्याला निवृत्त समजले पाहिजे. शुक्रवारी धोनी आयपीएल चेन्नईला पोहोचला आणि शनिवारी तो जिममध्येही दिसला होता.

39 वर्षीय एम.एस धोनीने कसोटी क्रिकेट मधून यापूर्वीच निवृत्तीची घोषणा केली आहे. एकदिवसीय आणि टी -२० सामन्यात तो भारतीय क्रिकेट संघाचा एक महत्वाचा भाग होता. पण आता धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धोनी क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचा कर्णधारही होता. तसेच धोनीच्या नावाच्या बर्याच मोठ्या विक्रमांच्या नोंदी आहेत.

बॅटिंग करताना तू मारलेला प्रत्येक यादगार फटका, किपिंग करताना तू अनेकांच्या उडवलेल्या दांड्या आणि कर्णधार म्हणून घेतलेला एक एक निर्णय क्रिकेटचा इतिहास आणि भारतीय रसिक कधीच विसरणार नाहीत ! तुझा खेळ सदैव आठवणीत राहील. अस म्हणत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी धोनीच्या निवृत्तीवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.