…अन्यथा आम्हालाही शेतकऱ्यांसोबत रुमनं हातात घ्याव लागेल-धनंजय मुंडे

नवसानं मुल झालं अन मुके घेऊन मेलं अशी भाजप-सेनेची अवस्था होईल-धनंजय मुंडे

टीम महारष्ट्र देशा: “आज कुठलाही शेतकरी वीज बिल भरू शकत नाही. त्यामागे वसुलीचा तगादा लावू नका अन्यथा आम्हालाही शेतक-यासोबत रुमनं हातात घ्यावे लागेल. त्यामुळे ही सक्ती मागे घ्या पंधरा वर्षाच्या नवसाने सत्ता जन्माला आली. मात्र नवसानं मुल झालं अन मुके घेऊन मेलं अशी भाजप-सेनेची अवस्था होईल”. असा घणाघाती टोला विधानपरिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारला लगावला आहे.

शेतकऱ्यांनी वीजबिल भरण्यासाठी सध्या सरकारची मोहीम सुरु आहे. पण सध्या शेतकरी वीजबिल भरण्याच्या अवस्थेत नसल्याच धनंजय मुंडेंनी सांगितलय दरम्यान नागपूर मध्ये झालेल्या हल्लाबोल मोर्चात शरद पवार यांनी सुद्धा शेतकऱ्यांना वीजबिल न भरण्याच अवाहन केल होत.