fbpx

‘कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती’ – धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएने जबरदस्त यश मिळवले आहे. महाराष्ट्रात भाजपने २३, शिवसेनेने १८ या आपल्या जागा कायम राखल्या तर काँग्रेसला अवघी १ जागा मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसनेही मागील वेळेप्रमाणेच आपल्या ४ जागा जिंकल्या. वंचित आघाडीने यंदा काँग्रेस-राष्ट्रवादीची दमछाक करत औरंगाबादेतून एक जागा निवडून आणली. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षेनुसार कामगिरी करता आलेली नाही.

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टि्वट केले आहे. कुछ किये बिना ही जय जय कार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, या कवितेच्या ओळी टि्वट करत त्यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना खचून न जाण्याचे आवाहन केले आहे.