fbpx

भाजपने ओबीसींचा केवळ मतांसाठी वापर केला – धनंजय मुंडे

घनसांगवी : राष्ट्रवादी कॉंग्रेस फक्त हाच पक्ष ओबीसी ला न्याय देऊ शकतो, भाजपाने केवळ त्यांचा मतांसाठी वापर केला असल्याचे मत विधानपरिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. ते माजी मंत्री राजेश टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त जालना जिल्ह्यातील घनसांगवी येथे आयोजित ओ.बी.सी. मेळाव्यात बोलत होते.

छगन भुजबळ हे तुरुंगात असल्यापासून राष्ट्रवादीचा ओबीसी चेहरा म्हणून धनंजय मुंडे हे आक्रमक पणाने आपली भूमिका मांडत आले आहेत. त्यात गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील ओबीसी नेता कोण याचा संघर्ष ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात सुरु आहे. अशात मोठ्या प्रमाणात ओबीसी मतदार हा भाजपच्या बाजूने असल्याने त्या मतदाराला आपल्याकडे वळवण्यात धनंजय मुंडेचा हा प्रयत्न असल्याच बोलल जात आहे.