fbpx

त्यांनी स्वतःच्या कर्माने स्वतःची नावे फेकू आणि फसणवीस करून घेतली -धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा: तुळजाभवानी मातेच्या दरबारात येऊन खोटे बोलणा-या मोदी आणि फडणवीस यांनी स्वतःच्या क्रमाने स्वतःची नावे फेकू आणि फसणवीस अशी करून घेतली आहेत. 3 वर्षात शेतकरी आणि मराठवाड्यावर अन्यायच केला असल्याचा घणाघात विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.

राज्यातील भाजप सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या टप्प्यातील हल्लाबोल आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली आहे. विनाअट आणि सरसकट शेतकरी कर्जमाफी, दूध आणि शेतीमालासाठी हमीभाव, विषारी औषध फवारणीमुळे बळी गेलेल्या शेतकरी कुटुंबियांना मदत, आरक्षण इत्यादी मागण्या या आंदोलनात करण्यात येत आहेत .यावेळी उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य मोर्चा नंतर ही अतिविराट सभा पार पडली त्यावेळी धनंजय मुंडे यांनी सरकारला चांगलच फैलावर घेतल.

पहा धनंजय मुंडेंचे संपूर्ण आक्रमक भाषण