धनंजय मुंडेंचे बड्डे सेलिब्रेशन थेट बारामतीत, पवारांनी भरवला केक

dhanajay munde bday

बारामती : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी या वर्षीचा वाढदिवस खास ठरला. खरंतर, मुंडे यांचा वाढदिवस काल झाला. पण त्याचे खरे सेलिब्रेशन आज बारामतीमध्ये झाले. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केक भरवून धनंजय मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

“कोरोनामुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामती येथे आदरणीय शरद पवार साहेबांची भेट घेतली. सुप्रिया सुळे ताईंनी काल झालेल्या वाढदिवसानिमित्त केक आणला. राष्ट्रवादी हे कुटुंब आहे. या कुटुंबाचा ‘आधारवड’ कायम कुटुंबासाठी भक्कम उभा असतो. धन्यवाद साहेब, ताई ! असाच आशीर्वाद राहू द्या” असे ट्वीट धनंजय मुंडेंनी केले आहे.

शासनाची बाजू अशीच भक्कमपणे मांडा, मराठा आरक्षणाच्याबाबतीत मुख्यमंत्र्यांसमवेत उपसमितीची बैठक

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाली होती. मुंबईतील रुग्णालयात काही दिवस उपचार घेतल्यानंतर ते करोनामुक्त झाले. घरी परतल्यानंतर काही दिवस ते क्वारंटाइन होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला वाढदिवस परळी येथील घरीच अत्यंत साधेपणानं साजरा केला होता. कार्यकर्त्यांनीही भेटायला येऊ नये असं आवाहन केलं होतं. त्यानंतर आज, वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी बारामती गाठून पवारांचे आशीर्वाद घेतले.

मोठी बातमी : भीमा कोरेगाव प्रकरणी अटकेत असणाऱ्या वरवरा राव यांना कोरोनाची लागण