धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप : अतुल भातखळकर यांचा पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा

bhatkhalkar- raut

मुंबई : मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर ठाकरे सरकार चांगलंच अडचणीत सापडलं आहे. त्यातच विरोधी पक्ष भाजपने देखील आक्रमक पवित्रा घेत थेट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. तसेच स्वतः धनंजय मुंडे किंवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा न घेतल्यास भाजप राज्यभर आंदोलन करत रस्त्यावर उतरेल, असाही इशारा देण्यात आलाय. त्यामुळे आता ठाकरे सरकार नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे

दरम्यान, धनंजय मुंडे प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसने काय भूमिका घ्यायची हे तेच ठरवतील. राष्ट्रवादीचे नेते सुजाण आणि प्रगल्भ आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा हे राष्ट्रवादीचे नेतेच ठरवतील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.गोपीनाथ मुंडे यांच्यावर असेच आरोप झाले होते. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची पाठराखण केली होती, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.‘राजकारणात शिखरावर जाण्यासाठी कष्ट करावे लागतात, आरोपांमुळे एका क्षणात उद्ध्वस्त करणे योग्य नव्हे’असे त्यांनी म्हटले.

या प्रकरणांवरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. ”मुंडे, मालिकांच्या प्रतापावर सामनामध्ये एखादा अग्रलेख पाडा की. जोरदार समर्थन करा आणि यात केंद्र सरकार कसे दोषी आहे हेही सांगा…लोक आतुरतेने वाट पाहतायत,” असा चिमटाही भातखळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना उद्देशून काढला आहे.

महत्वाच्या बातम्या