बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत अनेक इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. त्यामुळे आपापल्या पक्षातील नेत्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. इच्छुकांची संख्या वाढल्याने काही ठिकाणी बंडखोरी होण्याची शक्यता आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गर्दी करत रांगेत उभे राहून इच्छुकांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. अखेरपर्यंत १९ जागांसाठी १६० जणांचे तब्बल २१४ अर्ज दाखल झालेत.
२० मार्च रोजी होऊ घातलेल्या जिल्हा बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी १५ फेब्रुवारीपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. २४ फेब्रुवारी ते १० मार्च या दरम्यान अर्ज मागे घेता येणार आहेत. १२ मार्च रोजी चिन्हांचे वाटप होऊन २० मार्च रोजी मतदान होईल व २१ मार्च रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
जिल्हा बँकेची सत्ता काबिज करण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. सोमवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी ते बीडमध्ये तळ ठोकून होते. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या निवासस्थानातून त्यांनी सूत्रे हलविल्याची माहिती आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी यापूर्वी परळीत खलबते केली होती. सोमवारी देखील त्यांनी राजकीय डावपेच लढवल्याची चर्चा होती.
या दिग्गजांनी दाखल केले अर्ज
इतर शेती संस्था मतदारसंघातून बदामराव पंडित,रामदास खाडे, वसंत सानप, शशिकांत आजबे, महादेव तोंडे, अमोल आंधळे, धनराज मुंडे आदींचे अर्ज आहेत.कृषी प्रक्रिया मतदारसंघातून भाऊसाहेब नाटकर, आसाराम मराठे, बजरंग सोनवणे, जगदीश काळे यांचे अर्ज प्राप्त झाले. बँका, पतसंस्था मतदारसंघातून संगीता लोढा, राजकिशोर मोदी, आदित्य सारडा, संजय आंधळे, दीपक घुमरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.विमुक्त जाती, भटक्या जमाती मतदारसंघातून महेंद्र गर्जे, वसंत सानप, विजयसिंह बांगर, वैजीनाथ मिसाळ, शिवाजी फड हे मैदानात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- अहो दानवेजी, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले ऐकायचं नाही असं ठरवलं काय?
- संजय राठोड पोहरादेवीला रवाना; पूजा चव्हाण प्रकरणात काय भूमिका मांडणार याकडे लक्ष
- संजय राठोड यांच्या पाठीशी बंजारा समाजासोबत शिवसेना पक्षही उभा ?
- ‘मामी रॉक्स’ म्हणत इंधनदरवाढी वरून अभिनेत्याचा अर्थमंत्री सीतारमण यांना टोला
- कृतिबध्द आराखडा तयार करून गावाला विकासाचा आकार द्या: अर्जून खोतकर