टीम महाराष्ट्र देशा : बीड लोकसभा मतदार संघात भाजपच्या प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांच्या लढत झाली होती. यामध्ये प्रीतम मुंडे यांनी तब्बल दीड लाख मतांनी बजरंग सोनावणे यांचा पराभव केला आहे. हा पराभव हा बजरंग सोनवणे यांचा असला तरी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा या निवडणुकीतील वावर पाहता हा त्यांचा देखील पराभव मनाला जात आहे. मात्र कार्यकर्त्यांनी खचून न जाण्यासाठी कविता करत धनंजय मुंडे यांनी बुस्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
लोकसभा निवडणूक निकालाच्या आठवड्याभरानंतर धनंजय मुंडे माध्यमांसमोर आले. बीडमध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. बजरंग सोनवणे यांना उद्देशून धनंजय मुंडे यांनी एक कविता म्हटली.
तू दौड मे अव्वल आये ये जरुरी नहीं..
तू सबको पीछे छोड दे, ये भी जरुरी नहीं..
जरुरी है तेरा दौड मे शामील होना..
जरुरी है तेरा गिरकर फिरसे खडा रहना..
जिंदगी में इम्तिहान बहोत होंगे
आज जो आगे है, कल तेरे पिछे होगा
बस तू चलना मत छोडना, बस तू लढना मत छोडना
येत्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांचे खरे कसब पणाला लागणार असल्याने मुंडेंचे हे बुस्टिंग किती कामाला येथे आणि बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला किती यश मिळते हे पाहण्यासारख असणार आहे.
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<