जन्मदिन विशेष : महाराष्ट्राच्या राजकारणातील मुलुखमैदानी तोफ धनंजय मुंडे

dhananjay munde

विरेश आंधळकर : आपल्या वक्तृत्वाने महाराष्ट्रातीच्या राजकारणात ठसा उमटवणारे नेतृत्व म्हणून धनंजय मुंडे यांना ओळखलं जात. बीड जिल्हापरिषदेच्या सदस्य पदापासून सुरुवात करणारे धनंजय मुंडे यांनी आजवर जिल्हा परिषद उपाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष पद तसेच आता विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर काम पाहिलं आहे. भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झालेले धनंजय मुंडे आज राजकीय धुरंधर शरद पवार यांच्या आखाड्यात राजकीय कुस्ती लढत आहे.

गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केल्यानंतर परळी विधानसभेच्या जागेवर पंकजा मुंडे कि धनंजय असा प्रश्न निर्माण झाला, गोपीनाथ मुंडे यांनी पंकजांच्या बाजूने कौल दिला, परळीतीतून विधानसभेत जाण्याची महत्त्वाकांक्षा असणारे धनंजय मुंडे यामुळे नाराज झाले, दरम्यान, त्यांना विधानपरिषदेवर घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण काकांच्या निर्णयाने दुखावलेल्या पुतण्याने तेव्हाच बंडाचा झेंडा उभारला होता. याची पहिली ठिणगी २६ डिसेंबर २०११ साली परळी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष निवडीवेळी पडली.

Loading...

२६ डिसेंबर २०११ रोजी परळीत नगराध्यक्षपदाची निवडणूक होती. या निवडणुकीत काका गोपीनाथ मुंडे यांना धनंजय मुंडे यांनी धोबीपछाड दिला होता. धनंजय मुंडे यांचे उमेदवार दीपक देशमुख यांना २६ मत मिळाली तर काका गोपीनाथ मुंडे गटाच्या जुगलकिशोर लोहिया यांना अवघे ६ मते मिळाली. या निवडणुकीतूनच आणखीन एका काका – पुतण्याच्या संघर्ष महाराष्ट्राला पहायला मिळाला होता. पुढे १९ जानेवारी २०१२ मध्ये धनंजय मुंडे आणि त्यांचे वडील पंडितअण्णा मुंडे यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. यावेळी एक कविता चांगलीच गाजली होती, ती म्हणजे

काका कोणताही असो त्यावर प्रसंग बाका आहे
काकाला पुतण्यापासून हमखास धोका आहे
हातच्या कंकणाला आरसा कशाला ?
पुतणे विचारू लागले, वारशासाठी मुलगा / मुलगीच कशाला ?

२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदार संघातून पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा पराभव केला. मात्र, विधानपरिषदेवर वर्णी लावत राष्ट्रवादीने त्यांचे पुनर्वसन केले. पुढे राष्ट्रवादीचा झेंडा घेत परळी नगरपालिका, पंचायत समिती, बीड जिल्हा परिषद, निवडणुकीत त्यांनी दमदार कामगिरी केली आहे. विधान परिषद सभागृह असो कि रस्त्यावरची लढाई सर्वच ठिकाणी धनंजय मुंडें हे सरकारवर तुटून पडल्याच दिसून येत.

आज राज्यात सरकारविरोधात रान पेटवत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे तरुणांना आकर्षित करणारा आणि सभा गाजवणारा नेता म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे पहिल जाते. सभागृहात धनंजय मुंडे यांच्या अभ्यासू आणि आक्रमक भूमिकेमुळे सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी सध्या विरोधीपक्ष सोडत नाही. तर दुसरीकडे रस्त्यावरील आंदोलनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आवाज म्हणून सुद्धा आता धनंजय मुंडे यांच्याकडेच पहिले जात आहे

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही - खा. संजय राऊत
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
झोपड्यांना हात लावाल तर याद राखा - केंद्रियमंत्री रामदास आठवले यांचा सरकारला इशारा
भाजप नेत्यानेच उपस्थित केला सवाल, उदयनराजेंचे भाजपसाठी योगदान काय?