fbpx

राज्यातील सरकार ‘धृतराष्ट्र’ सारखे आंधळे; धनंजय मुंडेंचा सरकारवर हल्लाबोल

0Dhananjay_Munde_0

टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये पेरणीचा हंगाम सुरू झाला तरी शेतक-यांना पीककर्ज मिळत नाही, शेतक-यांना कर्जासाठी इतके हतबल व्हावे लागत की शरीरसुखाची मागणी करण्यापर्यंत अधिकारी , कर्मचा-यांची मजल गेली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याला ही लाजिरवाणी बाब असल्याच म्हणत विधानपरिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मान्सूनला सुरुवात झाल्यानंतर तब्बल दोन आठवडे पावसाने राज्यात पाठ फिरवली होती. त्यानंतर आता पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र, पेरणीसाठी पैसे नसल्याने शेतकऱ्याना पीककर्जासाठी बँकांचे उंबरे झिजवावे लागत आहेत. तर हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम काही बँक अधिकाऱ्यांकडून केले जात आहे. याच चित्र बुलढाणा जिल्ह्यातील सेंन्ट्रल बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरने शेतकरी महिलेकडे केलेल्या शरीर सुखाच्या मागणीवरून दिसून आलं.

दरम्यान, आता याच मुद्यावरून धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून सरकारवर निशाना साधला आहे. पेरणीचा हंगाम सुरू झाला तरी शेतक-यांना पीककर्ज मिळत नाही, शेतक-यांना कर्जासाठी इतके हतबल व्हावे लागले लागत की शरीरसुखाची मागणी करण्यापर्यंत अधिकारी , कर्मचा-यांची मजल गेली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याला ही लाजिरवाणी बाब आहे. पेरणीचा हंगाम सुरू झाला तरी शेतक-यांना पीककर्ज मिळत नाही, शेतक-यांना कर्जासाठी इतके हतबल व्हावे लागले लागत की शरीरसुखाची मागणी करण्यापर्यंत अधिकारी , कर्मचा-यांची मजल गेली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याला ही लाजिरवाणी बाब आहे. सरकार मात्र ‘धृतराष्ट्र’ सारखे आंधळे होऊन बसल्याची टीका त्यांनी केली आहे.

2 Comments

Click here to post a comment