आपल्या लोकांना जरा वेगळाच नाद लागलाय, असे म्हणत धनंजय मुंडेंनी दिला ‘हा’ उपरोधात्मक सल्ला

dhanajay munde image

बीड : ‘माझी अपेक्षा आहे की, पुढच्या वर्षीच्या पशु प्रदर्शनामध्ये आपल्या तालुक्यातील एखाद्या चांगल्या बैलजोडीला, गायीला, म्हशीला, शेळीला कुठलंतरी एक पारितोषिक मिळेल. याची जबाबदारी तुम्ही घ्याल तरच खऱ्या अर्थाने आम्ही आयोजित केलेले एवढे मोठे कार्यक्रम सार्थकी ठरतील, पशुधन सांभाळण्यासाठी नाद लागतो. मात्र, आपल्याकडे लोकांना पशुधनाचा कमी आणि नको त्या कामांचा जास्त नाद आहे,’ असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले.

परळीतल्या विभागीय पशु प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ‘आपण फक्त खिश्यात हात घालून पशु प्रदर्शनात लोकांचे पशुधन बघत फिरतो. मात्र आपलं एकही पशुधन यात सहभागी नसतं. कारण आपल्याला जरा वेगळा नाद लागला आहे. पशुधन सांभाळणं हा एक नाद आहे आणि तो परळीतील नागरिकांनी जोपासायला हवा. तरच आपल्या भागातील पशुधनालाही प्रदर्शनात पारितोषिके मिळतील,’ असे मुंडे यावेळी बोलताना म्हणाले.

Loading...

तसेच ‘माझा परळी मतदारसंघातील सामान्य माणसाच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवण्याचा आणि त्यांचं आर्थिक उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार आहे. या कामात दुग्ध व्यवसायाचा सिंहाचा वाटा असणार आहे,’ असे यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले. तसेच आपल्या लोकांना जरा वेगळाच नाद लागलाय. तो नाद जरा पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाकडे वळवा, असा सल्ला मुंडेंनी दिला.

दरम्यान, प्रदर्शन उभं करतात आणि त्या स्पर्धेत उतरुन बक्षिस घेऊन जातात. याचा मला अभिमान आहे. त्यामुळे मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे की, आपल्याला पशु संवर्धनाची ही मोहिम अतिशय भव्य पातळीवर घेऊन जायची आहे, असे ते म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'आम्ही रागावलो आहोत पण आम्ही अजूनही तुमच्या बाजूने आहोत'; कमल हासनचे मोदींना खरमरीत पत्र