धनुभाऊंनी गाळला घाम; गावकऱ्यांसोबत ३ तास केले श्रमदान

परळी: राजकारणात आपल्या प्रखर वक्तव्याने प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस चे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत भाग घेतलेल्या परळी विधानसभा मतदार संघातील गावांमध्ये सुरू असलेल्या कामात सहभाग घेतला, मुंडे यांनी गावकऱ्यांसोबत ३ तास श्रमदान केले. गावक-यांचा उत्साह,जिद्द पाहता ही स्पर्धा कोणी जिंकले तरी ही चळवळ यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यंदा सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा कालावधी ८ एप्रिल ते २२ मे २०१८ आहे. विजेत्या पहिल्या तीन गावांना अनुक्रमे ७५ लाख रुपये, ५० लाख रुपये आणि ४० लाख रुपये रोख पारितोषिक दिलं जाईल. स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातील आघाडीवर असलेल्या गावालाही प्रत्येकी दहा लाख रुपये रोख पारितोषिक मिळणार आहे. अशा रीतीने स्पर्धेत विजेत्या गावांना मिळणारी पारितोषिकांची एकूण रक्कम जवळपास १० कोटी रुपये असेल. यंदा ही स्पर्धा महाराष्ट्राच्या २४ जिल्ह्यांतील ७५ तालुक्यांपर्यंत विस्तारली आहे.