नवसाने मुल झालं आणि मुके घेऊन मारलं- धनंजय मुंडे

मोदींचं सरकार आल्यापासून देशातील जनतेचा रोजच एप्रिल फूल

मुरगूड: सरकारने हल्लाबोलचा असा धसका घेतला आहे की आता सरकारमधील लोक टीका करत आहेत. या सरकारमधील मंत्र्यांनी सत्ता येताच मोठ-मोठे भ्रष्टाचार केले आहेत. नवसाने मुल झालं आणि मुके घेऊन मारलं अशी परिस्थिती या सरकारची होऊ नये. अशी टीका विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या पाचव्या टप्प्याला सुरवात झाली आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनावर टीका करणा-या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना त्यांच्या खात्यात झालेला तूरीचा २५०० कोटींचा घोटाळा आठवतो का ? स्वतःच्या कारखान्यासाठी शेतक-यांच्या नावावर कर्ज काढून केलेली फसवणूक आणि लूट माहीत आहे का ? अशे प्रश्न उपस्थित केले.

आम्ही काल आई अंबाबाईचा रथ ओढला आणि तिला साकडं घातलं की राज्यात जे सरकार बसलं आहे ते भ्रष्टाचाराने बरबटलेलं आहे. या सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. तेव्हा या सरकारला हद्दपार करण्यासाठी आम्हाला बळ मिळो. दरम्यान, काल देशभरात एप्रिल फूलच्यानिमित्ताने लोकांनी मोदीजींचा वाढदिवस साजरा केला. मोदींचं सरकार आल्यापासून देशातील जनतेचा रोजच एप्रिल फूल होत आहे. अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

You might also like
Comments
Loading...