सरकार तर देवालाही फसवण्याचं काम करतंय, धनंजय मुडेंचं टीकास्त्र

dhananjay-munde..

टीम महाराष्ट्र देशा : हे सरकार २५ हजार कोटी बुलेट ट्रेनसाठी देते आहे. समृद्धी महामार्गासाठी ५५ हजार कोटी देते आहे. मग निळवंडे धरणासाठी साई संस्थानच्या तिजोरीतून पैसे का घेता, असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

आजपर्यंत जवळपास ७०० कोटींची मदत शिर्डी संस्थानने राज्य सरकारला केली आहे. जन्मशताब्दी वर्षाचे निमित्त साधून देशाचे पंतप्रधान शिर्डीला आले होते, तेव्हा ३२०० कोटी शिर्डी संस्थानच्या विकासासाठी देणार होते. पण त्यातला एक रुपयाही शिर्डी संस्थानाला मिळाला नाही. एकीकडे संस्थानाला जाहीर केलेली मदत द्यायची नाही आणि दुसरीकडे त्याच संस्थानाच्या तिजोरीलर डल्ला मारायचा, असे काम हे राज्य सरकार करत आहे. हे सरकार तर देवालाही फसवण्याचं काम करतंय, असा घणाघात मुंडे यांनी केला आहे.

मलबार हिल चे नाव बदलण्याची सेनेची मागणी, जाणून घ्या नवीन नाव