धनंजय केळकर यांना भारतीय व्यक्तींच्या पायाच्या मानकासह फुटवेअर बनविण्याचे पेटंट

पुणे : ‘धनसई लॅबोरेटरी’चे प्रमुख संशोधक धनंजय केळकर यांना भारतीय व्यक्तींच्या पायाच्या मानकासह फुटवेअर बनविण्याचे पेटंट मिळाले आहे. या फुटवेअरचा लाभ मुख्यतः मधुमेही, संधीवात आणि गुडघेदुखीच्या, टाचदुखीच्या रुग्णांना होणार आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत. ‘धनसई लॅबोरेटरी’चे प्रमुख संशोधक धनंजय केळकर यांनी ही माहिती दिली. हे पेटंट भारत सरकारच्या पेटंट कार्यालय या मानक संस्थेने 2 मे 2018 या दिवशी दिले आहे.

भारतात तीन, चार प्रमुख आणि दोन तुरळक असे पायांचे आकार आहेत. तसेच भारतीय पाय बऱ्यापैकी रुंद असतात आणि परदेशी मानकांवर आधारित फुटवेअर हे एकाच आकाराच्या पायांवर बेतलेले असते. त्यामुळे बहुतेक भारतीयांना ही पादत्राणे सोयीस्कर नाहीत. मधुमेही मज्जा र्हास आणि संधिवात यामुळे पायांचे आकार बदलले तर आधीच सोयीस्कर नसलेली पादत्राणे अधिकच त्रासदायक होतात. त्यामुळे पाय दुखणे आणि मधुमेहात पायांना जखमा होण्याचे प्रमाण वाढते.

हे महत्वपूर्ण निरिक्षण व्यापक पाहणीनंतर नोंदणाऱ्या ‘धनसई लँबोरेटरीज’च्या धनंजय केळकर यांना, पायाच्या मानकासह फुटवेअर बनवण्यासाठीचे पेटंट मिळाले आहे. हे फुटवेअरचे नाही, तर पायांचे मानक आहे. या पेटंट प्रमाणे प्रत्येक पायाला एका अनेक आकडी नंबरने प्रमाणित केले जाते.

मधुमेही रुग्णाला डायबेटिक फुट अल्सर झाल्यास ते अत्यंत खर्चिक आणि त्रासदायक असते. बरेचदा त्यामुळे पाय कापावाही लागू शकतो. हे टाळण्यासाठी सुयोग्य फुटवेअर घालणे आवश्यक असते. या फुटवेअरमध्ये पावलांवर पडणारा जास्तीचा दाब सगळीकडे सारखा पसरवण्यासाठी ‘प्रेशर सॉक’ असतो. पण बाजारात मिळणाऱ्या फुटवेअरमध्ये त्यासाठी पुरेशी जागा नसते. आणि त्यात सगळे पाउल न दाबता मावतही नाही.

पूर्वी भारतात पायाची मापे घेऊन चपला-बूट बनवले जात असत. पण तयार फुटवेअर बाजारात येऊ लागल्यावर मापाने बूट-चपला बनवून देणाऱ्यांचा व्यवसाय मागे पडला. उष्ण प्रदेशात पाय उघडे राहणारी पादत्राणेच जास्त बनवली जातात, तेथील लोकांचे पाय खूपच रुंद असतात. भारतीय आणि परदेशी मानकांपेक्षा भारतीय पाय हे -2 ते 50 मिलीमीटर रुंद असतात. याउलट थंड प्रदेशात शूज अधिक वापरले जातात. अशा परदेशी मानकांवर आधारित बनलेले शूज भारतीय पायात घालत असताना पाय त्यात कोंबावे लागतात.

परदेशात 10-12 नंबरचेच शूज मिळतात. प्रस्थापित मानकांप्रमाणे लांबी रुंदी आकार प्रकार या प्रमाणे दुकानात एकाच डिझाईनचे दहा हजार प्रकारचे फुटवेअर ठेवावे लागेल, इतकी विविधता भारतीय पायांत आहे. मापाप्रमाणे फुटवेअर बनवायला अतिकुशल कारागीर लागतात. त्यामुळे ते बनवणे खर्चिक होते.

धनंजय केळकर यांनी त्यांच्याकडून तयार झालेल्या फूटवेअरला ‘सेफ्फशू’ असे नाव दिले आहे.
धनंजय केळकरांच्या ‘सेफ्फशू’ फुटवेअर कंपनीत बहुतांश लागणाऱ्या सतराशे फुटवेअरचे आकृतिबंध तयार असतात. त्यात पायाच्या मापांबरोबरच उभे राहणे, चालणे, पायातील दोष याचाही विचार केला जातो. पाय, टाचा, गुडघे दुखण्याची कारणे यातच दडलेली असतात. त्यावरून पायाचा नंबर ठरतो व फुटवेअर बनवले जाते. त्यामुळे चालण्यात सहजता तर येतेच, पण पायाच्या कुठल्याही भागावर अनावश्यक दाब पडत नाही.

 

मनसेने महाराष्ट्राला दिले नवे पप्पू…!