fbpx

धनंजयला अंडी पिल्ल माहित नाहीत; तो अजून पूर्ण राष्ट्रवादीमय झाला नाही- अजित पवार

ajit pawar vs dhananjay munde

इंदापूर :  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  शेतकरी मेळाव्यात बोलतांना “धनंजयला अंडी पिल्ल माहित नाहीत. त्याला गाय माहित आहे . तिची सड माहित आहे”. अशी गमतीशीर खिल्ली उडवली.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून इंदापूरमध्ये शेतकरी मेळावा घेण्यात आला. या पूर्वी राष्ट्रवादीने संपूर्ण राज्यात हल्लाबोल आंदोलन करत भाजप सरकावर कणखर टीका केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांची नुकतीच निवड झाली. निवडीपूर्वी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर पक्ष नवीन जबाबदारी सोपवेल म्हणून जोरदार चर्चा सुरु होती. मात्र मुंडेना पवारांनी डावलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सद्या सुरु आहे.

अजित पवार इंदापूर वासियांना बोलतांना म्हणाले , “तुम्हाला इथली अंडी पिल्ल माहित आहेत. धनंजय अलीकडेच राष्ट्रवादीमय झाला. त्यामुळे त्याला आपल्यामध्ये मिसळायला थोडा वेळ लागेल. पण त्याला अंडी पिल्ल माहिती नाहीत. त्याला गाय माहिती आहे. तिची सड माहित आहे. आणि दुध काढायचं माहित आहे”.