fbpx

नाराज डिकोळे म्हणतात, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक सर्वांना सहकार्य करून पक्ष वाढवणार

टीम महाराष्ट्र देशा: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष संघटनेत फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे, सोलापुर जिल्हामध्ये देखील अनेक बदल करण्यात आले आहेत. मात्र, गेली अनेक वर्षे निष्ठावंत असणाऱ्या शिवसैनिकांना यामध्ये डावलण्यात आल्याने जुने पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे.

पंढरपूर तालुका प्रमुख असणारे संभाजी शिंदे यांना पक्षाकडून बढती देण्यात आली असून, त्यांची जिल्हाप्रमुख ( पंढरपूर विभाग ) पदी निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी मुंबईत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही निवड जाहीर केली. दरम्यान, शिंदे यांची जिल्हाप्रमुखपदी वर्णी लावण्यात पक्षाचे उपनेते आ. तानाजी सावंत आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांचा ‘सक्रीय’ सहभाग असल्याच बोलल जात आहे, तर या निवडीवरून डावलण्यात आलेले माजी जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे नाराज असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

संपूर्ण जिल्हात धनंजय डिकोळे हे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात, कुर्डूवाडी नगरपरिषदेवर भगवा फडकवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, जिल्हातील अनेक शिवसैनिक दुसऱ्या पक्षांची वाट धरत असतांना डिकोळे यांनी शिवसेनेतच राहण पसंत केले होते. मात्र, पक्षाकडून डावलण्यात आल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे.

तर सोलापूर जिल्हा शिवसेनेत मतभेद असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. मी बाळासाहेब व उद्धव साहेब यांचा कट्टर शिवसैनिक असून, आजवर शिवसैनिक म्हणूनच पक्षाचे काम एकनिष्ठेने केले आहे, यापुढे देखील करत राहणार असल्याच धनंजय डिकोळे यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना सांगितले. तसेच नवीन पदाधिकारी आमचे सहकारी असून, त्या सर्वांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचंही त्यांनी सांगितले.

आड आला तर ! छाताडावर बसून शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवेन- उद्धव ठाकरे