हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई यांची कारागृहातून सुटका

टीम महाराष्ट्र देशा : आयटी अभियंता मोहसीन शेख हत्याप्रकरणी अटकेत असलेला संशयीत आरोपी हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई यांची आज येरवडा कारागृहातून सुटका करण्यात आली. आपल्याला जामीन मिळावा यासाठी देसाई यांनी मुंबई उच्च न्यायालयात अॅड. अभिजीत देसाई यांच्यामार्फत जामीन अर्ज केला होता. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाकडून 17 जानेवारी रोजी धनंजय देसाई यांचा जमीन मंजूर करण्यात आला होता.

सोशल नेटवर्किंग साईटवरील काही वादग्रस्त पोस्टमुळे पुण्यामध्ये 2014 साली तणाव निर्माण झाला होता. त्याच काळात 2 जून 2014 साली आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या मोहसीन शेख याची हत्या करण्यात आली होती. मोहसीन शेख हा तरुण मुळचा सोलापूरचा असून तो पुण्यामध्ये नोकरीनिमित्त वस्त्व्यास होता.

गेली ४ वर्ष मोहसीनचे कुटुंबीय त्याला न्याय मिळावा यासाठी सतत प्रयत्न करत होते. पण हत्येप्रकरणी मुख्य आरोपी धनंजय देसाई यांची आज सुटका करण्यात आल्याने मोहसीनच्या कुटुंबीयांनी दु:ख व्यक्त केले.