आईची जमीन नको, चिक्कीत खालेल्ले पैसे शेतकऱ्यांना द्या – धनंजय मुंडे

dhananjay munde

टीम महाराष्ट्र देशा: पंकजा मुंडे कारभारी असलेल्या वैजनाथ साखर कारखान्यावरून सध्या मुंडे बहिण – भावामध्ये टोकाची टीका सुरु आहे. कारखान्याकडे थकलेले शेतकऱ्यांचे पैसे देण्याची मागणी धनंजय मुंडे यांच्याकडून होत आहे, तर पंकजा मुंडे यांनी शेतकऱ्यांच एक रुपयाही देन बाकी ठेवणार नसून वेळ पडल्यास आपल्या आईची जमीन गहाण ठेवणार असल्याचं सांगितल आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी आईची जमीन गहाण ठेवण्यापेक्षा, चिक्कीत खाल्लेले पैसे दिले तर बरं होईल, असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार चारुलता टोकास प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मुंडे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. पंकजा यांनी चिक्कीत २०० कोटी तर फोनमध्ये ७० कोटी खाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

पंकजा मुंडे यांनी विरोधी पक्ष नेते  धनंजय मुंडे हे मंत्र्यांच्या विरोधात लक्षवेधी लावत तोडपाणी करतात, सेटिंग करणारे गोपीनाथ मुंडेंचे वारस असू शकत नाहीत, अशी टीका देखील केली होती. धनंजय मुंडे यांनी पलटवार करत मी स्वतःला मुंडे साहेबांचा वारस कधीच समजलं नाही, तो वारसाहक्क पंकजाताईंनीच सांभाळावा, असा टोला लगावला आहे.