राणे साहेबांच काही खर नाही तर सुरेश धस कीस झाड की पत्ती- धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा – :  सुरेश धस यांना आष्टी मतदार संघासाठी काहीच करायचं नाही फक्त स्वतःची खळगी भरण्यासाठीच  धस भाजपात गेले आहेत. त्याचबरोबर सुरेश धस यांनी बीड जिल्हा परिषद निवडणुकीत बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून तब्बल १५ कोटी रुपये घेतले व जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपला साथ दिली असल्याचा गौप्य स्पोट विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. आष्टी मध्ये बाळासाहेब आजबे यांच्या राष्ट्रवादी पार्टीत प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी धनंजय मुंडे बोलत होते.

सुरेश धस यांना विकास दिसत नाही. अजित दादांनी देखील सुरेश धस यांना समजवल तरीदेखील सुरेश धस यांना ऐकल नाही.राणे साहेबांच काही खर नाही तर सुरेश धस कीस झाड की पत्ती आहे अस म्हणत धनंजय मुंडे यांनी धस यांच्यावर कडाडून टीका केली आहे. त्यामुळे ऐन थंडीच्या काळात बीडच राजकारण चांगलच तापणार आहे हे मात्र नक्की आहे.