fbpx

परळीत येणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ १० रूपयात जेवण मिळणार

टीम महाराष्ट्र देशा : नाथ प्रतिष्ठानच्या वतीने चालवल्या जाणार्या स्व. पंडीतअण्णा मुंडे शेतकरी भोजन गृहाचा शुभारंभ विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. परळी शहरात कामानिमित्त येणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना आता केवळ १० रूपयात जेवण मिळणार आहे. आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी झीजणाऱ्या स्व. पंडीतअण्णा मुंडेंच्या स्मृती या योजनेच्या माध्यमातून कायम ठेवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. अस धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे.

दुष्काळी परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना परळीत आल्यानंतर अल्प दरात जेवण मिळवून त्यांना आधार देण्याच्या उद्देशाने नाथ प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात जेवणासाठी येणाऱ्या खर्चापैकी शेतकऱ्यांकडून फक्त १० रूपये घेतले जाणार तर उर्वरित खर्च नाथ प्रतिष्ठान करणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

परळीत आयुष्मान भारत योजनेच्या अडीच हजार लाभार्थ्यांना गोल्डन कार्डाचे थाटात वितरण

#पक्षांतर : हा तर राजकीय भ्रष्टाचार; धनंजय मुंडेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे सहा हजार आठशे तेरा कोटी रूपयांची मागणी