धनंजय मुंडेंची मोर्चेबांधणीला सुरुवात ; पत्नी राजश्री मुंडे प्रचाराच्या मैदानात

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहे.

बीड जिल्ह्यातील प्रतिष्ठेचा समजलेल्या परळी मतदारसंघात आता राजकीय हालचाली वाढू लागल्या आहेत. धनंजय मुंडे यांच्यासाठी आता त्यांच्या सौ. राजश्री मुंडे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे . मतदारसंघातील कार्यक्रम आणि महिलांच्या बैठकीला त्या हजेरी लावत असल्याचे पाहायला मिळत आहे.

राजश्री मुंडे यांनी परळी शहरातील कार्यक्रमात बाजीराव धर्मअधिकारी यांच्या निवासस्थानी संपन्न झालेल्या एका बैठकीत महिलांशी संवाद साधला. त्याच बरोबर संत श्रेष्ठ सावता महाराज समाधी सोहळ्या निमित्त सुरु असलेल्या सप्ताह सोहळ्यात त्यांनी सहभाग नोंदवत, राम नामाची महती सांगणारे भजन गायले. अशा पद्धतीने त्यांनी विविध उपक्रमांना हजेरी लावून जनसंपर्क वाढवायला सुरुवात केली आहे .

दरम्यान , या मतदारसंघात धनंजय मुंडे यांची लढत ही ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी होणार आहे . २०१४ च्या निवडणुकीत पंकजा यांनी धनंजय यांच्यावर 25 हजारांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला होता. त्यामुळे हो लढत आता अत्यंत चुरशीची होणार आहे.

कार्यकर्त्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून धनंजय मुंडेना आठवले आपले पहिले भाषण

विधानसभा निवडणूक : ‘हा’ उमेदवार आश्वासनं बॉन्ड पेपरवर लिहून देणार

‘धनुभाऊ तुमच्या राजकीय वजनासोबत शारीरिक वजन देखील वाढो’