मुख्यमंत्र्यांचा ‘विसरभोळा गोकुळ’ झाला आहे – धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : दीड वर्ष होत आली तरी सरकारने दिलेली आश्वासन पूर्ण केली नाहीत याच्या निषेधार्थ पुणतांबा येथील तीन मुलींने ‘किसान क्रांती’च्या वतीने गेले तीन दिवस झाले अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. शुभांगी जाधव, पूनम जाधव, निकिता जाधव या तिघी शेतकरी कुटुंबातून आहेत. दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्वीटरवरून या तीन कन्यांवर अन्नत्याग उपोषण करावयास सरकारने वेळ आणली आहे अशा आशयाचे ट्वीट केले आहे.

सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांच्या लेकींना उपोषण करावं लागत आहे. तसेच हे सरकार दीड वर्षाआधी दिलेल आश्वासनं पूर्ण करू शकले नाहीत. तर मुख्यमंत्र्यांचा ‘विसरभोळा गोकुळ’ झाला असून कोणतीच आश्वासनं पूर्ण करतील याची काडीमात्र शक्यता नाही. असा टोला धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना लावला आहे.

Loading...

दिवसेंदिवस शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत आहेत. अनिश्चित पर्जन्यमान , वेळोवेळी करावा लागणारा दुष्काळाचा सामना , बँकांची शेतीसाठी घेतलेली कर्जे , नेहमीच तोट्यात नेणारा बाजारभाव यासाऱ्या कारणांमुळे शेतकरी भरडला जात आहे. तसेच सरकारची बेताल व अविश्वसनीय आश्वासन यासाऱ्या प्रकारामुळे शेतकरी कुटुंब हे नेहमीच दारिद्र्य रेषेच्या जवळ भटकत असते. शेतकऱ्यांच्या असणाऱ्या विविध मागण्या सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी या तीन कन्यांनी गेले तीन दिवस झालं अन्नत्याग आंदोलन केले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
मराठा क्रांती मोर्चाचा पहिला बळी ' मी ' ठरलो : आमदार भारत भालके
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
रडत राऊतांमुळे यापुढे सामना बंद,बंद,बंद : मनसे
माझं कुणी काहीच ' वाकडं ' करू शकत नाही : संजय राऊत