fbpx

ओबेरॉयचे ‘विवेक’शून्य ट्विट : ‘स्वतःच्या नावाला शोभेल इतकी तरी विवेकबुद्धी दाखवायची’ – मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : अभिनेता विवेक ओबेरॉयने आज आपल्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ऐश्वर्या राय, सलमान खान, विवेक ओबेरॉय आणि अभिषेक, आराध्यासोबतचे तीन फोटोज आहेत. सलमान, ऐश्वर्याच्या फोटोवर ‘ओपिनियन पोल’ लिहिले होते, ऐश्वर्या विवेकच्या फोटोवर ‘एग्झिट पोल’ लिहिले होते, तर नवरा अभिषेक आणि मुलगी आराध्यासोबतच्या फोटोवर ‘रिजल्ट्स’ असे लिहिले होते.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही ट्वीट करत विवेक ओबेरॉयला लक्ष्य केले. यावेळी त्यांनी "स्वतःच्या नावाला शोभेल इतकी जरी विवेकबुद्धी दाखवली असती तर बरं झालं असतं. महिलांचा अवमान करणाऱ्या या वृत्तीचा मी धिक्कार करतो" अस ट्विट करत विवेक ओबेरॉयवर जोरदार हल्ला चढवला आहे.

मात्र विवेकचे हे ट्विट आल्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. विवेक ओबेरॉयने विवेकशून्य ट्विट करून आपली अक्कल ठीकाण्यावर आहे का असा सवाल विचारण्यास भाग पडल आहे.