VIDEO: शिवसेनेने बोर्डवरील वाघाचं चित्र काढून शेळीच नाही तर सशाच चित्र लावावं – धनंजय मुंडे

उमरगा: हि बिगर दाताची सेना भाजप समोर एवढी लाचार झाली आहे की शिवसेनेने कृपा करून गावा गावात आपले जे बोर्ड लावले आहेत त्यावरील वाघाच चित्र काढून शेळीच नाही तर सशाच चित्र लावावं. असा घणाघात करत विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. तसच भाजप आणि सेनेमधील हे भांडण आपल्यासाठी नाही तर त्यांच्या आप-आपसातील वाट्यासाठी असल्याची टीका सुद्धा धनंजय मुंडे यांनी केली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दुसऱ्या टप्प्यातील हल्लाबोल आंदोलनातील उमरगा येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. राज्यातील भाजप सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या टप्प्यातील हल्लाबोल आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली आहे. विनाअट आणि सरसकट शेतकरी कर्जमाफी, दूध आणि शेतीमालासाठी हमीभाव, विषारी औषध फवारणीमुळे बळी गेलेल्या शेतकरी कुटुंबियांना मदत, आरक्षण इत्यादी मागण्या या आंदोलनात करण्यात येत आहेत.

पहा काय म्हणाले धनंजय मुंडे