परळीतील ‘त्या’ प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही – धनंजय मुंडे

मुंबई : परळी येथील व्यापारी व अन्य काही जणांमध्ये आपसात झालेल्या वादातून मारहाण करण्यात आल्यानंतर संबंधित आरोपींवर कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करून २४ तासांच्या आत त्यांना अटक करण्यात आली आहे. अशा घटनेमध्ये मी कोणाचीही गय करणार नाही असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

परळी येथील टॉवर चौक परिसरात काल (दि. १७) रोजी दोन गटात प्रॉपर्टीच्या वादातून भांडण झाले होते, त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यांनतर भांडणातील आरोपी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या, त्यांनतर मुंडेंनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Loading...

परळी येथील व्यापारी, नागरिक सगळेच जण माझे निकटवर्तीय आहेत, जवळचा किंवा दूरचा असे काही नाही. दोघांच्या वादात कुणीही कायदा हातात घेणार असेल तर त्याची गय मी करणार नाही. कोणत्याच परिस्थितीत शहरातील कायदा व सुव्यवस्था बिडघडलेली मी खपवून घेणार नाही. पोलीस प्रशासनाला तशा सूचना दिल्या असून संबंधित आरोपींवर ३०७ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यातील आरोपींना २४ तासाच्या आत अटक करण्यात आली आहे असेही यावेळी बोलताना मुंडे म्हणाले.

परळीतील व्यापारी, नागरिक या सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी माझी असून प्रत्येकजण माझ्या जवळचेच आहेत. येथील सर्वांशी माझी नाळ थेट जोडलेली आहे, त्यामुळे कुणाचेही वाद हे लोकांना माझ्याशी संबंधित वाटतात. परंतु हे भांडण त्यांच्यातील व्यक्तिगत कारणातून असून संबंधितांवर कडक कारवाई होईल, व्यक्तिगत भांडणांमध्ये माझे नाव जोडून अशा प्रकारची बदनामी करू नये असे आवाहनही मुंडेंनी केले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....