आमदार होण्यासाठी ‘वर्षा’च्या गणपतीचे दर्शन कामी येणार नाही ; धनंजय मुंडेंचा क्षीरसागरांना टोला

टीम महाराष्ट्र देशा : बीड जिल्हात आता राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये सुरु झालेला अंतर्गत कलह सर्वश्रुत झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयदत्त क्षीरसागर हे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच वर्षा येथे गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये चांगलाच वातावरण तापायला सुरवात झाली आहे. यावरून आता थेट विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आपल्याच पक्षातील जयदत्त क्षीरसागर यांच्यावर चांगलच तोंडसुख घेतल आहे.

बीडमध्ये आमदार व्हायचे असेल तर मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणपतीचा नव्हे तर राजुरीच्या गणपतीचा आशीर्वाद मिळावा लागतो अशा शब्दात मुंडे यांनी क्षीरसागर यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला.

पक्षाविरोधात बोलाल तर खबरदार; अजित पवारांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना सुनावले

बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा शनिवारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे यांनी भाषण केले. या भाषणामध्ये क्षीरसागर यांचे नाव न घेता मुंडे यांनी म्हटलं की मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणपतीचा 10 दिवस आशीर्वाद घेतला तरी त्या पेक्षा राजुरीचा आशीर्वाद महत्वाचा आहे. राजुरी इथे गणपतीचे मंदीर असून ते जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. या ठिकाणाला राजकीय महत्व देखील आहे, कारण राजुरीची ग्रामपंचायत ही संदीप क्षीरसागर यांच्या ताब्यात आहे.

राष्ट्रवादीने तिकीट दिले नाही तर घाबरू नका, आमच्याकडे या; आठवलेंची उदयनराजेंना ऑफर