राज्यातील पत्रकारांवर गुप्त वार्ता विभागामार्फत पाळत का ठेवली जाते ? : धनंजय मुंडे

cm

टीम महाराष्ट्र देशा: मागील काही दिवसांपासून सोशल मिडीयावर मजकूर लिहिणाऱ्यांना पोलिसांकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते यावर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यातील पत्रकारांवर गुप्त वार्ता विभागामार्फत पाळत का ठेवण्यात येते असा सवाल देखील मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

सरकारचा भोंगळ, भ्रष्ट कारभाराविरुद्धचा जनआक्रोश दडपून टाकण्यासाठी सरकारने अभिव्यक्ती आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी करण्याची हीन पातळी गाठली असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्याचबरोबर सरकार पत्रकारांवर गुप्त वार्ता विभागाकडून पाळत का ठेवली जात आहे असा प्रश्न देखील मुंडे यांनी उपस्तीत केला आहे.