सीमाभागातील मराठी बांधवांच्या लढ्याला बळ देण्यासाठी धनंजय मुंडे आज बेळगावात

टीम महाराष्ट्र देशा – कर्नाटकच्या सीमाभागातील मराठी बांधवांच्या लढ्याला बळ देण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे सोमवारी बेळगांव मध्ये जाणार आहेत.

कर्नाटक सरकारचे मंगळवार पासून बेळगाव मध्ये अधिवेशन सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनेही सोमवारी बेळगाव मध्ये मराठी बांधवांचा महा मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास धनंजय मुंडे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

सीमा भागातील मराठी बांधवांमध्ये धनंजय मुंडे यांच्या भाषणाची मोठी क्रेझ असून ते या भागात प्रथमच येत असल्याने मराठी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंडे हे सकाळी बेळगाव येथे पोहचणार आहेत.

You might also like
Comments
Loading...