धनगर आरक्षण : प्रकाश आंबेडकर घेणार बारामतीत मेळावा

टीम महाराष्ट्र देशा- भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर राष्टवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीमध्ये एक मेळावा घेणार आहेत. आंबेडकर यांनी धनगर आरक्षणासाठी बारामती येथे मेळावा घेण्याच्या घोषणा केली आहे. बारामती तालुक्यात धनगर समाजाची संख्या लक्षणीय आहे. हा मेळावा म्हणजे पवार- जानकर यांच्या पारंपारिक मतदारांना आपल्याकडे वळविण्याचा एक भाग असल्याची चर्चा आहे.

भारिप बहुजन महासंघ हा प्रामुख्याने दलितांच्या प्रश्नावर काम करणारा पक्ष असल्याची सर्वत्र ओळख आहे. मात्र हा मेळावा घेवून संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या धनगर समजाला आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न या मेळाव्याच्या माध्यमातून केला जाईल अशी शक्यता आहे. विशेष म्हणजे बारामती लोकसभा मतदार संघात धनगर समाजाने आपली ताकत मागील लोकसभा निवडणुकीत दाखवून दिली आहे.