ग्रामपंचायतीचंं धुमशान! जाणून घ्या निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

मुंबई : २५ जिल्ह्यांमधील ६५४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्यात होणार आहेत. तसेच राज्य निवडणूक आयोगाने २७ मे २०१८ ला निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याची घोषणा केली. तसेच ३३ जिल्ह्यांतील २ हजार ८१२ ग्रामपंचायतीमधील ४ हजार ७७१ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची सुद्धा घोषणा झाली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ७ ते १२ मे २०१८ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. त्यांची छाननी १४ मे २०१८ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे १६ मे २०१८ पर्यंत मागे घेता येणार असून त्याच दिवशी चिन्ह वाटप होईल. यामध्ये सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे.

वाचा जिल्हानिहाय ग्रामपंचायतींची संख्या

ठाणे- ५, पालघर- ३, रायगड- १८७, सिंधुदुर्ग- २, नाशिक- २०, धुळे- ७, जळगाव- ८, अहमदगनर- ७७, पुणे- ९०, सोलापूर- ३, सातारा- २३, सांगली- ८२, कोल्हापूर- ७४, औरंगाबाद- ४, बीड- २, नांदेड- ७, परभणी- १, उस्मानाबाद- ३, लातूर- ५, अकोला- २, यवतमाळ- २९, वर्धा- १४, भंडारा- ४, गडचिरोली- २

You might also like
Comments
Loading...