‘मेहेंदी’ या गाण्यावरील धकधक गर्ल माधुरीचा गरबा; चाहते पडले प्रेमात..!

madhuri

मुंबई : ‘धकधक गर्ल’ म्हणून प्रसिध्द अभिनेत्री माधुरी दीक्षित सर्वपरिचित आहे. तिच्या अभिनयावर तसेच नृत्यकलेवर प्रेक्षक सदैव फिदा असतात. अनेक हिट चित्रपट तिच्या नावावर असून नुकताच तिचा डान्स व्हिडिओवर चाहते फिदा झाले आहेत.

सध्या नवरात्रीचा सण चालू असून आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात अनेक कलाकार गरबा- दांडियाचे आपले व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अशातच माधुरीनेही तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती, ‘मेहेंदी’ या गाण्यावर गरबा करताना दिसत आहे. गाण्याच्या धूनवर माधुरी ज्याप्रकारे नाचत आहे. यातील एक्सप्रेशन्स आणि अदांसह माधुरी खूपच सुंदर दिसत आहे. यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचा अतिशय सुंदर लेहंगा घातला आहे, ज्यात तिचं मनमोहक रूप चाहत्यांना भुरळ घालत आहे.

दरम्यान माधुरी दीक्षित तिच्या वेब सीरिज ‘फाइंडिंग अनामिका’विषयी चर्चेत असून या मालिकेद्वारे तिने ओटीटीवर पदार्पण केलं आहे. ही वेब सिरीज एक सस्पेन्स फॅमिली ड्रामा सिरीज आहे. यात माधुरी दीक्षितसोबत संजय कपूर, मानव कौल हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत. सध्या ती डान्स रियॅलिटी शो ‘डान्स दिवाने’मध्ये जज म्हणून दिसत आहे. सोशल मीडियावरील या व्हिडिओमुळे चाहते मात्र प्रेमात पडले नाही तरच नवल.

महत्वाच्या बातम्या