निक्की तांबोळीला बिग बॉसने दिली खरी ओळख..

nikki

मुंबई : दाक्षिणात्य सिनेमात झळकणारी निक्की तांबोळी. मात्र तिला खरी ओळख आणि प्रसिध्दी बिग बॉसच्या घराघरात मिळाली आहे. या शोमध्ये निक्कीने आपल्या बिनधास्त अंदाजाने लोकांची मने जिंकली. हेच कारण आहे की निक्की रिअॅलिटी शो विश्वातील मोठं नाव झाली आहे.

नुकतीच निक्की खतरों के खिलाडी ११ मध्येही दिसली होती. या शोमधूनही तिने लोकप्रियता वाढवली. काही महिन्यांपूर्वीच कोरोना संक्रमणामुळे निक्की तांबोळीच्या भावाचं निधन झालं होतं. त्यानंतर लगेच ती खतरों के खिलाडीच्या शूटींगसाठी बाहेर गेली होती. ज्यामुळे तिला ट्रोलही करण्यात आलं होतं. नुकताच तिने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, जेव्हा ती कॉलेजमध्ये होती तेव्हा तिचा एक बॉयफ्रेन्ड होता. निक्की म्हणाली की, ‘सुरूवातीला याबाबत घरातील लोकांना माहीत नव्हतं. पण जशी त्यांना याची खबर लागली. त्यांनी माझं कॉलेजला जाणंच बंद केलं होतं.

दरम्यान, असं सांगितलं जात आहे की, सध्या निक्की तांबोळी काही मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. निक्कीने तमिळ आणि तेलुगु भाषेतील काही सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिने साउथचा सुपरहिट सिनेमा कंचाना ३ मध्येही काम केलं आहे. पण बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी ती बिग बॉसच्या घरात गेली. याचा तिला चांगलाच फायदा झाला असून ती प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनत असते.

महत्वाच्या बातम्या