fbpx

माझ्या विजयाची बातमी कळताच माझ्या आईचे उर भरून आले : धैर्यशील माने

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. या लोकसभा निवडणुकीमध्ये काही अविश्वसनीय आणि धक्कादायक निकाल लागले आहेत. असाच एक धक्कादायक निकाल हातकणंगले येथे लागला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना शिवसेनेचे युवा उमेदवार धैर्यशील माने यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. हा पराभव राजू शेट्टींसाठी जितका लाजीरवाणा होता तितकाच धैर्यशील माने यांच्या आईसाठी अभिमानास्पद आणि उर भरून आणणारा होता.

आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना धैर्यशील माने यांनी विजय झाल्यानंतर आपल्या आईची पहिली प्रतिक्रिया काय होती याबाबत भाष्य केले. माने म्हणाले की, माझा विजयाची बातमी आईला कळताच माझी आई भावूक झाली व माझा आईच उर भरून आल होत. कारण २००९ मध्ये हातकणंगलेतून माने यांच्या आईने राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवली होत. मात्र, त्यावेळी राजू शेट्टींनी त्यांचां दारूण पराभव केला होता. मात्र या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार राजू शेट्टींची विजयी घौडदौड धैर्यशील माने यांनी यशस्वीरीत्या रोखली. त्यामुळे धैर्यशील माने यांचा विजय हा त्यांच्या आईसाठी अभिमानाचा ठरला.

आईच्या पराभवाचा १०  वर्षांनी घेतला बदला

मतदारसंघांची पुनर्रचना होण्यापूर्वी इचलकरंजी मतदारसंघातून धैर्यशील माने यांची आई माजी खासदार निवेदिता माने या १९९९ आणि २००४ मध्ये लोकसभा जिंकल्या होत्या. २००९ मध्ये हातकणंगलेतून त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवली. मात्र, यावेळी राजू शेट्टींनी त्यांचां दारूण पराभव केला होता.

विजयी रथावर आरूढ झालेल्या राजू शेट्टींनी २०१४ मध्येही विजय मिळवला. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या कल्लापा आवाडेंचा पराभव केला होता. आईच्या पराभवाचा १० वर्षांनी घेतला बदला घेत यंदा निवेदिता मानेंच्या पुत्रानेच खासदार राजू शेट्टींची विजयी घौडदौड रोखली.