fbpx

बमभोलेच्या गजराने दुमदुमलली राजेश्वर नगरी

अकोला : अकोला जिल्ह्याचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री राजराजेश्वराला पूर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्यासाठी शहरातील असंख्य कावडधारी सोमवारी सकाळी कावड व पालख्या घेऊन शिवभक्त अकोल्यात दाखल झाले. जुने शहरातून सर्वाधिक कावड काढणाऱ्या असंख्य मंडळांनी एकच जल्लोष केला.

गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पाण्याने श्री राजेश्वराला जलाभिषेक करण्याची ७१ वर्षांची परंपरा आहे. खांद्यावरून सर्वाधिक भरणे आणण्याची स्पर्धा कावडधारी शिवभक्तांमध्ये रंगली आहे. जुने शहरातून सर्वाधिक भरणे असलेली कावड डाबकी रोडवासी मित्र मंडळाची असून, यंदा ७७१ भरण्यांची कावड काढली गेली आहे. त्यापाठोपाठ हरिहरपेठमधील जय भवानी मित्र मंडळाची ७५१ भरणे, मानाचे स्थान असलेल्या हरिहर शिवभक्त मंडळाची ४०१ आणि सर्वाधिक चार हजार सदस्य असलेल्या जय बाभळेश्वर शिवभक्त मंडळाच्यावतीने १११ भरण्यांची कावड अकोलेकरांसाठी आकर्षण ठरणार आहे.