‘देवमाणूस’ फेम माधुरी पवारची विठ्ठलभक्ती, अभंग गातानाचा व्हिडीओ केला शेअर

मुंबई: महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले विठ्ठल हे सर्वसामान्यांचे, कष्टकऱ्यांचे दैवत आहेत. विठ्ठलाच्या भेटीला हजारो वारकरी पायी पंढरपूर चालत जातात. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर मागील वर्षीप्रमाणे यदांच्या वारीवर प्रशासनाने बंदी घातलेली आहे.

वारीवर जरी बंदी आली तरी मात्र विठ्ठलाची भक्ती आणि उत्साह कायम आहे. यादरम्यान टिव्ही अभिनेत्री माधुरी पवारने अभंगातून विठ्लाची भक्ती व्यक्त केली आहे. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर माधुरीने तिच्या इंस्टाग्राम या सोशल मिडीयावर अभंग गातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. वारतरी वेश परिधान करत माधुरीने "माझे माहेर पंढरपूर" गात चाहत्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कपाळावर टिळा, डोक्यावर पगडी, हातात टाळ आणि ओठी विठुरायाचे नाव घेत माधुरीचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. माधुरीच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. समाज माध्यमांवर माधुरी नेहमी सक्रिय असते. आता नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओमुळे तीने पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. माधुरी पवार सध्या झी मराठीवरील ‘देवमाणुस’ या मालिकेत चंदाचे पात्र साकारत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP