देवगड पंचायत समितीचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात

सिंधुदुर्गनगरी : देवगड पंचायत समितीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत बांधकाम विभागात स्थापत्य अभियंता पदावर कार्यरत असलेल्या सदानंद सत्यवान चव्हाण याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी दहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. शनिवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हे रोजगार सेवक आहेत. पाडगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या एमआरइजीएस योजनेमार्फत रस्त्याचे बांधकाम सुरू होते. रस्त्याच्या पूर्ण झालेल्या बांधकामात क्रमांक 29 प्रमाणे एमबी रेकॉर्ड तयार करण्याकरता यातील तक्रारदार यांनी सदानंद चव्हाण याच्याकडे मस्टर सादर करून मोजमाप व मूल्यांकन करून देण्याची विनंती केली होती. या कामाकरता चव्हाण याने तक्रारदारकडेवीस हजार रुपयांची मागणी केली.याबाबत तक्रारदार यांनी दिनांक ३ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार दिनांक ४ जानेवारी आणि ५ जानेवारीला केलेल्या पडताळणीत चव्हाण याने तक्रारदाराचे काम करून देण्यासाठी वीस हजार रुपयांची मागणी करून ताडजोडीअंती पहिला हफ्ता म्हणून दहा हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.

You might also like
Comments
Loading...