नोव्हेंबर संपण्यापूर्वी आरक्षणाची वैधानिक प्रक्रिया पूर्ण होणार – मुख्यमंत्री

टीम महाराष्ट्र देशा : सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, इतर कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल. नोव्हेंबर संपण्यापूर्वी आरक्षणाची वैधानिक प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. फडणवीस यांनी आज महाराष्ट्राला संबोधित निवेदन केले आहे. यावेळी ते बोलत होते

मूठभर हिंसा करणारे आणि सोशल मीडियावर अपप्रचार करणाऱ्यांवर समाजाने नेतृत्व सोडलं तर आंदोलन दिशाहीन होईल, समाजातील लोकांनी पुढे येत चर्चा करण्याची गरज असल्याचं मतं फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

सध्याची वेळ ही राजकारण करण्याची नसून एकत्र येत काम करण्याची गरज आहे. आरक्षणासाठी कोणीही हिंसा अथवा आत्महत्या करू नये. कायद्याची पूर्तता झाल्याशिवाय आरक्षण देणे कठीण असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तसेच स्थानिक यंत्रणांनी सरकारला सहकार्य करण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे.

मराठा आरक्षणप्रश्नी काळजीपूर्वक सकारात्मक पावले उचलावी लागतील : शरद पवार

७ ऑगस्टपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा … सकल मराठा मोर्चाकडून सरकारला अल्टिमेटम