कुछ भी हो ! देवेंद्र फडणवीसचं राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री होणार : अमित शहा

टीम महाराष्ट्र देशा : जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयावर भाष्य करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आले आहेत. गोरेगाव येथील नेस्को संकुलात अमित शहा यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी अमित शहा यांनी येत्या काळात देवेंद्र फडणवीसचं पुन्हा मुख्यमंत्री असणार, असा विश्वास व्यक्त केला आहे. अमित शहा यांचे भाषण जरी काश्मीर बाबत असले तरी निवडणुका लागल्यानंतर भाजपचा आज खऱ्या अर्थाने प्रचाराचा नारळ फुटला आहे.

यावेळी अमित शहा म्हणाले की, राज्यातील जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसचं पुढचे मुख्यमंत्री असणार आहेत. तसेच काश्मीरचा प्रश्न हा आमच्यासाठी राजकीय मुद्द नसून ती एक राष्ट्रभक्ती आहे. त्यामुळे कॉंग्रेस काश्मीर बाबत टीका करत असलं तरी आम्ही आमची राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रनिष्ठा निभावत आहोत, असे अमित शहा म्हणाले.

दरम्यान पंतप्रधान मोदींनी कलम 370 हटवल्या मुळे काश्मीरच्या नागरीकांना देशातील सर्व अधिकार मिळू लागले आहेत. मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे. पहिले मुलींना बालविवाहला बळी पडावे लागत होते. मात्र आता बालविवाहाचा कायदा लागू झाल्याने मुलींनाही न्याय मिळाला आहे. तीन कुटुंबांनी माजवलेला भ्रष्टाचार आता संपुष्टात आला आहे. आज जर काश्मीर मध्ये भ्रष्टाचार झाला नसता तर काश्मीरमधील घरांना सोन्याचा पत्रा लागला असता. मात्र या भ्रष्टाचारामुळे आणि दहशतवादामुळे हा ऐतिहासिक निर्णय घ्यावा लागला. मात्र कॉंग्रेसने या निर्णयाला संसदेत विरोध केला. त्यामुळे आता मतदारांनीचं या विरोधकांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन अमित शहा यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या