ADVERTISEMENT
नागपूर: शिवसेना नेते यशवंत जाधव, त्यांचे सहकारी आणि बीएमसी कंत्राटदार यांच्या निवासस्थानी ईडीने धाड टाकली होती. त्यात कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी असलेली जाधव यांची डायरी सापडली असून त्यामध्ये मातोश्रीला २ कोटी रुपयांची भेट दिल्याची नोंद आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोरोना काळात भ्रष्टाचार चालू होता, असे आम्ही म्हणत होतो. तेच खरं आहे हे आता सिद्ध झालं आहे, असं फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच या प्रकरणाची उचित चौकशी तपास यंत्रणा करतील, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: