fbpx

सत्तापरिवर्तनाचे खरे शिल्पकार गोपीनाथ मुंडे – देवेंद्र फडणवीस

टीम महाराष्ट्र देशा- सत्तेशी संघर्ष करण्याचा मार्ग मला गोपीनाथ मुंडेनी दाखवला.गोपीनाथ मुंडे यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे देशात सत्ता परिवर्तन होऊ शकले.सत्तापरिवर्तनाचे खरे शिल्पकार गोपीनाथ मुंडे असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या ४ थ्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

सामन्यांच्या जीवनात परिवर्तन करू शकण्याची ताकद गोपीनाथ मुंडे यांच्यात होती. गोपीनाथ मुंडे यांच्याकडे पाहून लढण्याची शक्ती मिळते. मुंडेंचा आशीर्वाद मागे असल्यामुळेच कितीही संकटे आली तरी आम्ही त्या संकटांचा सामना करत आहोत. गोपीनाथ मुंडे यांचा वारसा समर्थपणे फक्त पंकजा मुंडेच चालवत आहेत असं म्हणत धनंजय मुंडे यांना देखील टोला लगावला. मुंडे साहेबांवर प्रेम करणारे उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्यासारखे बंधू असल्यावर पंकजा ताई यांना चिंता करण्याचे काहीच कारण नसल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या ४ थ्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,खासदार उदयनराजे भोसले,खासदार संभाजीराजे भोसले,सहकारमंत्री सुभाष देशमुख, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, यांच्यासह अनेक राम शिंदे,सदाभाऊ खोत,मंत्री,आमदार खासदार उपस्थित होते.

दरम्यान आज आज गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. यावेळी पंकजा मुंडे या भाषणाला सुरुवात करताना उपस्थितांचे स्वागत केले. त्यांनी सुरेश धस याचं स्वागत करताना भावी आमदार सुरेश धस असं म्हणत स्वागत केलं. पंकजा मुंडे यांनी केलेल्या या आगळ्यावेगळ्या स्वागतानंतर धस यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. प्रेक्षकांनी देखील धस यांच्या या उल्लेखला भरभरून दाद दिली.