देवेंद्र फडणवीस यांचं भवितव्य उज्ज्वल पण फक्त…

पुणे: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं भवितव्य उज्ज्वल आहे पण त्यांनी ध्यानीमनी नसताना गेलेल्या सत्तेचा धक्का लावून घेतला आहे,तेवढ्या धक्क्यातून ते एकदा सावरले म्हणजे बाकी त्यांचं भवितव्य उज्ज्वल आहे,असं मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज पुण्यात व्यक्त केलं.

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित एका कार्यक्रमाला विशेष आमंत्रित सदस्य म्हणून संजय राऊत आज पुण्यात आले होते.त्यावेळी त्यांनी सगळ्या विषयावर मनसोक्त गप्पा मारल्या.पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना खास आपल्या शैलीत उत्तरे दिली.

त्यावेळी बोलतांना त्यांनी असे म्हटले की विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्र्यांमध्ये संवाद असायला हवा, पण कुठेतरी हा संवाद थांबला आहे, हे राज्य आमचं आहे अशी भावना विरोधकांची असायला हवी, सत्ता गेली तर राज्याची दुश्मनी करता येणार नाही, सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचा अधिकार विरोधकांना आहे. पण राज्याच्या बेईमानी करू नका, देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय अनुभव वाढत चालला आहे. सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊ आलं नाही, ध्यानीमनी नसताना सत्ता गेली त्याचा धक्का अजून पचवू शकले नाहीत. त्यातून देवेंद्र फडणवीसांनी बाहेर पडावं भविष्य उज्ज्वल आहे असा चिमटा संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांना काढला आहे.

दरम्यान ,बाळासाहेब ठाकरे नेहमी विरोधकांचे ऐकायचे, त्यांच्यासोबत चर्चा करायचे, हीच परंपरा महाराष्ट्राची आहे, काँग्रेस असो शरद पवार असो सगळ्यांनी ही परंपरा कायम राखली आहे, संवाद राखणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे, राजकारणासाठी आम्ही हिंदुत्वाचा वापर केला नाही, सगळ्यांना बरोबर घेऊन चाललो, असं संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या